पुणे : बहुजननामा ऑनलाइन – संत सेवालाल महाराज यांच्या २८० वी जयंती निमित्त भव्य बंजारा पारंपारिक रँली काढून संत सेवालाल महाराज यांना आभिवादन करण्यात आले आहे. राष्ट्रिय बंजारा परिषद चे राष्ट्रिय अध्यक्ष मा.किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शना खाली १५ फेब्रुवारी रोजी भव्य बंजारा पारंपारिक रँली काढण्यात आली आहे.
राष्ट्रिय बंजारा परिषद खेड पुणे यांच्या तर्फे राष्ट्रिय बंजारा परिषद चे राष्ट्रिय अध्यक्ष मा.किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शना खाली १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जय घोष करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला हार घालून संत सेवालाल महाराज यांच्या २८० वी जयंती निमित्त भव्य बंजारा पारंपारिक रँली काढली आहे. विशेष म्हणजे, बंजारा समाजाची संस्कृती व वेश भूषा हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण होते. इतकेच नव्हे तर यावेळी देशा साठी प्राण देणारे शहीद जवान यांना श्रधांजलि वाहन्यात आली व पाकिस्तान चा निषेधही करण्यात आला.
यावेळी खेड चे आमदार दिलीपशेठ मोहीते पाटील ,विश्व गोर बंजारा सेवा संघ चे अध्यक्ष युवराजदादा आडे , जि. प. सदस्य अनिल आंबा राक्षे , अँड. रमेश राठोड ,राष्ट्रिय बंजारा परिषद चे प्रदेश प्रवक्ता अमोलभाऊ पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी धारूर ता. अध्यक्षा कमलताई यु. आडे, संतोष भाऊ राठोड (आळंदीकर), RBP युवा नेते सतीश राठोड ,युवा नेते महेश चव्हाण ,सचिन राठोड , प्रमोद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.