भोपाळ : बहुजननामा ऑनलाइन – वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी भोपाळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले होते.त्यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह हे दहशतवादी आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात मला उभं राहावं लागलं, १६ वर्षांपूर्वी उमा भारती यांनी लढत दिली होती असं विधान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं आहे.
त्या भोपाळमध्ये एका सभेत बोलत होत्या.काही दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंह यांना शहीद हेंमत करकरे यांच्यासंबंधात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली होती. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर जोरदार टीका होत होती. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्या विधानावरून माघार घेत माफीही मागितली होती