बहुजननामा ऑनलाईन – भारतीय सैन्यदलात Indian Army ने पहिल्यांदाच महिलांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. सैन्यदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची भरती होत आहे. महिलांच्या सैन्य भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात भारतीय सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
भारतीय सैन्यात भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारांना २५ एप्रिल २०१९ पासून www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर अर्ज दाखल करता येईल. सैनिक पोलीस दलामध्ये महिलांना २० टक्के प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी जाहीर केले होते. सध्या या विभागात जनरल ड्युटीसाठी १०० पदांसाठी रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. यासाठी महिला उमेदवारांची उंची १४२ सेंटीमीटर आणि वय १७ ते २१ वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांमधून छाननी केलेल्या उमेदवारांना शारीरिक आणि लेखी चाचणीसाठी बोलावण्यात येईल.
For the first time, Indian Army to start online registration of women for recruitment as soldiers into the military police, today. The project was mooted by General Bipin Rawat soon after taking over as Army Chief and given final approval by the Defence Ministry recently. pic.twitter.com/nIssIN62zX
— ANI (@ANI) April 25, 2019