मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईमधील जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांनी ४० वर्षांच्या एका व्यक्तीचा जीव वाचवला असून या व्यक्तीने त्याच्या गुप्तांगामध्ये स्टीलची रिंग घातली होती. तीन मिलिमीटरच्या या रिंगने त्या माणसाला खूप वेदना होत होत्या. इतकेच नव्हे तर त्याचा जीव जाण्याची वेळ आली होती. डॉक्टरांनी अतिशय किचकट शस्त्रक्रिया करत या माणसाची वेदनांपासून सुटका केली असून त्याचा जीव वाचवला आहे.
ही रिंग कापण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलवून त्यांनी ही रिंग कटरच्या साहाय्याने कापून रुग्णाची सुटका केली. या व्यक्तीला कोणीतरी सांगितले की संभोगाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गुप्तांगात रिंग घाल. त्यावर विश्वास ठेवून या व्यक्तीने घरात सापडलेली एक ‘कोनाकृती’ रिंग घातली. काही वेळात रिंग घट्ट बसल्यामुळे निघायलाच तयार नाही. तसेच त्यालां रिंग थोड्या वेळाने गळून पडेल, असे वाटले. पण रिंग गळून पडली नाही आणि घरच्यांना कळले तर लाज जाईल म्हणून त्याने आठवडाभर त्रास सहन केला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
वेदना अजून वाढल्यामुळे काही दिवसांनी त्याला लघवी होणे बंद झाले. त्यामुळे त्याला जे.जे. रुग्णालयात नेऊन तपासल्यानंतर त्याच्या गुप्तांगाच्या कातडीवर गँगरीन झालं आहे. नसा सुजल्याने ही रिंग घट्ट रुतून बसल्याचेही डॉक्टरांना कळले. तसेच रिंग कापून काढावी लागणार असून त्यासाठीचे कटर रुग्णालयात नव्हते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क करून एका अधिकाऱ्यांनी एका खासगी कंत्राटदाराशी संपर्क साधल्यावर कटर मिळवून दिले. कटर मिळाल्यावर मध्यरात्री ते कापण्याची प्रक्रिया सुरु केली. हळूहळू या व्यक्तीची प्रकृती सुधारून त्याच्या वेदनाही कमी होतील, असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच कोणाचाही सल्ला ऐकून आनंद मिळवण्यासाठी अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालू नये, असाही सल्ला शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे.