बहुजननामा ऑनलाईन टीम : भाजपचे बंडखोर उमेदवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्या संपर्कात असून वेगळा विचार करण्यासाठी या दोन्ही नेत्यांवर दबाव असल्याचे कळत आहे. हे सर्व पराभूत बंडखोर आहेच. मात्र त्यांना 30 हजार ते 90 हजारापर्यंत मते मिळाली आहे. भाजपवर अनेक नेते नाराज असल्याची चर्चा असताना पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरून भाजपचा उल्लेख टाळल्याने पंकजा मुंडे सुद्धा भाजपला सोडचिट्ठी देणार का ? अशा प्रकारच्या चर्च्यांना उधाण आले होते. त्यानंतर आता भाजपसमोर सध्या बंडखोरीचे मोठे संकट असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने तिकीट डावलले तरी मोठा संघर्ष करुन, बंडखोरी करुन निवडणूक लढवून मोठे मताधिक्य मिळवले, परंतू विरोधात बसावे लागल्याने बंडखोर अस्वस्थ आहेत.
महाविकासआघाडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकीसाठी वेगळी समीकरणे दिसण्याची शक्यता आहे. बंडखोरांच्या यादीमध्ये मराठवाड्यापासून ते विदर्भ पर्यंत अशा सर्वच भागातील बंडखोरांचा समावेश आहे. त्यामुळे आता हे बंडखोर भविष्याच्या विचाराने नेमकं काय हालचाली करतात हे पाहून महत्वाचं ठरणार आहे. 11 ते 12 भाजपचे बंडखोर उमेदवार विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंच्या संपर्कात आहे. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या दोघांनाही पक्षाने तिकीट नाकारले होते त्यामुळे बंडखोर तावडे आणि खडसे संपर्कात असण्यामागे 2014 च्या आधीच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आह. या दोघांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. आता एकनाथ खडसे आणि विनोद तावडे बंडखोरांची समजूत कशी काढणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. परंतु या बंडखोरांमध्ये भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपने डावलले या नेत्यांना तरीही यांनी चांगले मताधिक्य मिळवले.
सीमा सावळे – 18429 ( दर्यापूर ) , योगेंद्र गोडे – 29943 (बुलडाणा ), दिलीप कंडकुरते – 43357 ( नांदेड दक्षिण ), शमरजित सिंग घाटगे – 88303 ( कागल ) , राजू बकाने – 39541 ( देवळी ), नरेंद्र पवार – 43209 ( कल्याण पश्चिम ), चरण वाघमारे – 79490( तुमसर ), निशिकांत भोसले – 43394 (इस्लामपूर), दिलीप देशमुख – 45846 ( अहमदपूर ), संतोष जनाथे -30952 ( बोईसर ), शिवाजी जाधव – 67070 ( बसमत ), समाधान अवताडे – 54124 ( पंढरपूर )
Visit : bahujannama.com