नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आथा सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिजर्व बँक ऑफ इंडीयाने यावेळी ०.३५ ने रेपो रेट कमी केला आहे. त्यामुळे आता सामान्यांच्या कर्जाचा इएमआय स्वस्त होणार आहे.
Reserve Bank of India (RBI) cuts Repo Rate by 35 basis points to 5.40%. Reverse Repo rate at 5.15% pic.twitter.com/bNvRNLdh1H
— ANI (@ANI) August 7, 2019
याआधीचा रेपो रेट ५.७५ होता. तर आता ०.३५ ची कपात केल्याने आता तो ५.४० एवढा झाला आहे. रेपो रेट कमी झाल्याने आता बँकांवर गृहकर्ज आणि वाहन कर्ज यांचे व्याजदर कमी करण्यासाठी दबाव वाढणार आहे. तर आरबीआयने रिवर्स रेपो रेटही कमी केला आहे. तो आता ५.१५ एवढा आहे.
जीडीपी अनुमानामध्ये कपात
आरबीआयने चालू आर्थिक वर्षातील जीडीपी अंदाज ७ टक्क्यांवरून ६.९ टक्क्यांवर आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीचे भारताला ५ ट्रीलीयन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य असताना आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारताची जीडीपी ग्रोथ ८ टक्के करण्याचा प्रयत्न सुरु आहेत.
आरबीआयचा ऐतिहासिक निर्णय
मागीत तीन तिमाहीमध्ये रेपो रेटमध्ये क्रमश: ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. तर चौथ्यांदा ऑगस्टमध्ये रेपो रेटमध्ये सलग कपात केली आहे. इतिहासात पहिल्यांदा रिझर्व बँकेने चौथ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. २०१८ मध्ये गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत दास गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर आता ४ वेळा बैठका झाल्या आहेत.
काय असेल याचा परिणाम?
आरबीआयच्या या निर्णयानंतर याचा फायदा ऑटो लोनच्या इएमआय सुरु असलेल्या कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. रेपो रेट कमी केल्याने बँकांवर व्याज दर कमी करण्यासाठी दबाव वाढेल. यापुर्वी सलग रेपो रेट कमी केल्यानंतरही ग्राहकांना याचा फायदा मिळाला नव्हता. त्यामुळेच अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांना रेपो रेट कमी झाल्यानंतर त्याचा लाभ कर्जदारांना देण्यास सांगितले होते.
- ‘या’ पॉइंटवर फक्त ४५ सेंकद करा मसाज, होतील ७ जबरदस्त फायदे ; जाणून घ्या
- ‘या’ ७ वनौषधी करतील मेंदूला ‘तल्लख’, जाणून घ्या कसे करायचे उपाय
- बेली फॅटमुळे हाडे होतात कमुकवत, याकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष ; जाणून घ्या
- स्वतःच्या हाताने का होत नाही गुदगूल्या ? मेंदूशी संबंधित १० आश्चर्यकारक गोष्टी
- तुम्हालासुध्दा माहिती नसेल, मुलांना ‘या’ ५ कारणांमुळे येतात पिंपल्स ; जाणून घ्या
- सावधान ! ‘या’ रोगांमुळे होऊ शकतो २४ तासांत मृत्यू, जाणून घ्या लक्षणे