बहुजननामा ऑनलाईन – सरफराज अहमद हा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बकरी ईदनिमित्त बैलाची कुर्बानी देणार आहे. आपल्या मुलाबरोबर यासाठी तो बैल खरेदी करायला बैल बाजारात गेल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिला आहे. बकरी ईद निमित्त दर वर्षी पाकिस्तानमध्ये प्राण्यांची खरेदी करण्यासाठी बाजार भरले जातात. बकरी ईदनिमित्त पाकिस्तानमध्ये दरवर्षी हजारो प्राण्यांची कुर्बानी दिली जाते. रमजान ईदनंतर बरोबर ७० दिवसांनी येणारा बकरी ईद हा दिवस मुस्लिम धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
Pakistan captain @SarfarazA_54 brought his animals for the obligation of #EidulAzha #Cricket #Pakistan #Karachi #Lahore #SarfarazAhmed #Captain #Eid pic.twitter.com/4EIU1zYz60
— Khel Shel (@khelshel) August 4, 2019
सरफराज अहमद बैलबाजारात फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये दिसत आहे की सरफराज आपला मुलगा आणि जवळच्या मित्रांबरोबर तो कुर्बानीची बैल खरेदी करण्यासाठी आला आहे. बैल खरेदी करण्याआधी तो आपल्या मुलाशी चर्चा करतानाही व्हिडिओ मध्ये दिसत आहे. पाकिस्तानमध्ये बकरी ईदच्या दिवशी बैलाचाही बळी दिला जातो.
विश्वचषक स्पर्धा सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने खेळली होती. पाकिस्तानी संघाला या स्पर्धेमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच आता सरफराजचा कर्णधारपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरफराजकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.