पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सध्या तरुण पिढी शिक्षित होऊ लागली आहे त्यांच्यासाठी रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे रिपब्लिकन युवक आघाडीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. लवकरच तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. पुणे स्टेशन येथील युवक मेळाव्याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलत होते.
खासदार रामदास आठवले यांची केंद्रीय मंती पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन युवक आघाडीचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी केले होता. या कार्यक्रमास शहरातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार आगामी काळात सामाजिक न्याय विभागासाठी नवनवीन योजना राबविणार असून त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. तसेच उदयोग व्यवसायाकडे तरुणांनी वळले पाहिजे.
या प्रसंगी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अशोक कांबळे, युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, युवक आघाडी शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, असित गांगुर्डे, महिपाल वाघमारे आदी उपस्थित होते.