नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – १६-नांदेड लोकसभा काँग्रेस -भाजपा–वंचित आघाडी ही तिहेरी लढत सुरू आहे प्रचार व प्रसार करण्यासाठी नेते मंडळी जिल्ह्यात नव्हे तर तालुक्यात,गाव तांड्यात सभा घेत आहेत,भारतीय जनता पार्टी चे महायुती चे उमेदवार प्रताप पा चिखलीकर यांच्या प्रचारार्थ चक्क देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बालेकिल्लात येऊन ऐतिहासिक सभा घेऊन काँग्रेस पक्षाचे नेते मंडळींची खिल्ली उडवली.
प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाथीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राहुल गांधी ना काही दिवसात टीव्ही वाले सांगतील की जर राहुल गांधी भाषण करत असतील तर टीव्ही वाले आधीच म्हणतील की हे सर्व काल्पनिक आहे आम्ही केवळ ही राहुल गांधींची सभा आम्ही मनोरंजन साठी आपणास दाखवत आहोत असे देखील टीव्ही न्युज वाले म्हणतील असेही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी बोलले, या वेळी त्यांनी मोदी सरकार कडून केलेली कामे देखील त्यांनी सांगितले मै ना खाऊगाँ ना खाने दुंगा अशी घोषणा मोदीजी ने केली त्यांनी किमान 34 कोटी लोकांना बँकेत जनधन खाते उघडवण्यास सांगितलं आज पर्यन्त त्यांनी 80 हजार कोटी रुपये जनधन खात्यात जमा केले आहे अशी माहिती त्यांनी या वेळी दिली,विम्याच्या योजना असो,सामाजिक न्याय योजना असो,शेती,शौचालय,घरकुल पैसे ते पैसे डायरेक्ट अकाऊंट मध्ये टाकण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे ते तलाठी,तहसीलदार किंवा आबु डाबी कोणीच नाही ते पैसे कुठंही एक पैशाचा भ्रष्टाचार न करता आपल्या खात्यात जमा होत आहेत असे ते बोले,मोदी पंतप्रधान झाले तेव्हा 45% शौचालय होते आज पर्यंत त्यांनी 98% पर्यंत देशात शौचालय झाले आहेत ते म्हणाले की,सूर्य बुडण्याची वेळ व सूर्य उगवण्याची आधीची वेळ पाहून माझी माय माऊली बाहेर जात असत असा ही लोकांना पटेल असा शब्द या वेळी त्यांनी बोला,13 कोटी लोकांना उज्वला योजनेतून कोट्यवधी लोकांना गॅस पोहचले असल्याचे त्यांनी या वेळी आकडेवारी सांगितले,माय माऊली च्या पोटात धूर जाऊ नये म्हणून त्यांना उज्वला योजना मोफत लागू केली असे ही त्यांनी यावेळी बोले.इ स 2022 पर्यंत अनेक घरकुल लोकं पर्यंत पोहचतील त्या पैकी महाराष्ट्र मध्ये 5 लाख घरे पूर्ण झाली आहेत,5 लाख बाकी आहेत, शहरात प्लॉट घेऊन देत आहोत,अतिक्रमण असलेले नियमित करून देण्याचा सरकार काम करणार आहे असे त्यांनी या वेळी बोले.असे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले