पोन्नानी : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकित राहुल गांधी हे दक्षिणतेल्या वायनाड मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे हा मतदार संघ चांगलाच चर्चेत होता त्यानंतर आता दक्षिणेतला आणखी एक मतदारसंघ चर्चेत आला आहे. जिथे काँग्रेसला आजपर्यंत एकदाही विजय मिळवता आलेला नाही. केरळमधील पोन्नानी असे या मतदार संघाचे नाव आहे . १९५१ साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते २०१४ च्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या एकाही उमेदवाराने विजय मिळवलेला नाही.
पहिल्या १९५१ सालच्या लोकसभा निवडणुकीत पोन्नानीमधून किसान मजदूर प्रजा पार्टीचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर १९६२, १९६७ आणि १९७२ मधून डाव्या पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळवला आणि १९७७ ते २०१४ तब्बल ११ वेळा इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या उमेदवाराने पोन्नानी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
पोन्नानी लोकसभा मतदार संघ हा १९५१ साली बहुसदस्यीय मतदारसंघ होता. या मतदारसंघातून दोन खासदार लोकसभेवर पाठवण्यात आले. त्यात एक अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून एक सामान्य वर्गासाठी होती . १९५१ मध्ये जे दोन खासदार लोकसभेवर पाठवण्यात आले. त्यातील एक खासदार किसान मजदूर प्रजा पार्टीचा तर एक काँग्रेसचा होता. काँग्रेसने दोन उमेदवार उभे केले होते.
किसान मजदूर पार्टीच्या केलाप्पन कोयाहापाली यांनी सर्वाधिक मते मिळवून सामान्य गटातून खासदार म्हणून विजयी झाले. इचीरन अय्यानी हे अनुसूचित गटातून खासदार म्हणून लोकसभेवर गेले होते.मते मिळवण्यात तिसऱ्या क्रमांकावर होते. असूनही पोन्नानीमधून काँग्रेसचा उमेदवार लोकसभेवर गेला. पण आतापर्यंत काँग्रेसला कधीही इथे निवडणूक जिंकता आलेली नाही.