बहुजननामा ऑनलाइन टीम – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसी
बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआय ला दिलेल्या माहितीनुसार पहिल्या डावात एकही बळी न घेतलेल्या उमेश यादवने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्सला माघारी धाडलं होतं. दुखापतीमुळे उमेश यादव उर्वरित कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या जागेवर भारतीय संघात टी. नटराजनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातील समावेश निश्चित आहे; परंतु रोहितला खेळवण्यासाठी मयांक अगरवाल किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला वगळण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे. याचप्रमाणे रोहित नेमका कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार, ही क्रिकेटपटूंची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.