पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला. वारजे ब्रीज खालून गणपती माथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघातात बुधवारी घडली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली आहे.
सुनिता मदन राठोड (वय ३२, रा. कोंढवे धावडे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तुषार बाळासाहेब वाघमारे (वय २५, रा. रामनगर, वारजे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महादेव राठोड (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुनिता व मदन वारजे ब्रीजखालून पायी चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वार तुषारने सुनिताला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे सुनिता गंभीररित्या जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपास उपनिरीक्षक डमरे करीत आहेत.