नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या वेगाने वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची सुरुवात झाल्यानंतर वैज्ञानिक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी अनेक दावे केले होते. संशोधनातून आलेल्या माहितीच्या आधारे तज्ज्ञांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. असाच एक रिसर्च अमेरिकेत देखील झाला होता.
संशोधकांनी अमेरिकेत केलेल्या रिसर्चनुसार, जीवघेणा व्हायरसने संक्रमित असलेल्या 80 टक्के लोकांकडून इतरांना संक्रमण होण्याचा धोका कमी असतो. तर 20 टक्के कोरोनाचे रुग्ण हे सुपर स्प्रेडर असतात, असे तज्ज्ञांनी सांगितले. या सकारात्मक माहितीमुळे तज्ज्ञांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अमेरिकेतील फ्रेट हचिंसन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या एका संशोधनात दिसून आलं आहे की, कोविड-19 सुपर स्प्रेडरच्या माध्यमातून पसरतो.
केवळ 20 टक्के रुग्ण इतरांना संक्रमीत करतात
संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की, कोरोना संक्रमित लोकांमध्ये केवळ 20 टक्के रुग्ण असे असतात जे इतरांना संक्रमित करतात. संशोधकांच्या टीमचे प्रमुख तज्ज्ञ फिशर फ्रेड हच पोस्ट़ॉक्टोरल, आशीष गोयल आणि ब्रायन मेयर यांनी सांगितले की, या व्हायरसची तुलना सामान्य फ्ल्यूशी करण्यासाठी एक कॉम्प्युटर मॉडेल तयार करण्यात आले आहे.
सुपर स्प्रेडर म्हणजे काय
सुपर स्प्रेडर ज्यावेळी असतो तेव्हा संक्रमित व्यक्ती आपल्या पीक कॉन्टॅगिय पॉइंटवर असतो. तसेच लोकांमध्ये उठणं बसणं सुरु असतं. त्यावेळी तो इतरांना संक्रमीत करु शकतो. त्याचप्रमाणे कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण झालेलं असतं. पण इतरांना नाही. म्हणजेच पॉझिटिव्ह व्यक्ती पीक कॉनटॅगियस पॉईट नव्हता. संशोधकांनी लोखोंच्या संख्येत कम्प्युटर सिम्युलेशन चालवले आणि त्याद्वारे एका डेटाची तुलना केली. मात्र, याबाबत WHO कडून अधिकृत माहिती दिलेली नाही.