पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police News | राज्यातील पोलिस घटकांची कार्यक्षमता, कामगिरी वाढविणे, गुन्हेगारीला आळा, तपास, कायदा-सुव्यवस्था इत्यादी बाबतीत दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या 2021 च्या पोलिस घटक स्पर्धेत पुणे पोलिसांना पोलिसिंगमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पारितोषिक देवुन सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त तथा अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता (ADG Amitabh Gupta) यांना पारितोषिक प्रदान करून सन्मानित केले आहे. (Pune Police News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची एक बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. बैठकीदरम्यान सर्वोत्कृष्ट पोलिस घटक स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह इतर अति वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. (Pune Police News)
सन 2021 मध्ये पुणे पोलिसांनी तत्कालीन आयुक्त तथा अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता
यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पोलिसिंगमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेकडो
गुन्हे उघडकीस आणले. अनेक गुन्हयांची उकल केली.
पोलिसांनी प्रभावीपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला म्हणून पुणे पोलिसांना पारितोषिक देवुन सन्मानित करण्यात आले आहे.
Web Title :- Pune Police News | Best Police Component Award to Pune Police for using state-of-the-art technology in policing
हे देखील वाचा :
Shriya Pilgaonkar | अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या मराठमोळ्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष
Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या एअरपोर्ट लूकने वेधले सर्वांचे लक्ष