बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एथनिक लूक मधील फोटोज शेअर केले होते. आता पुन्हा एकदा श्रियाने मराठमोळ्या लूक मधील काही फोटोज शेअर केले आहेत. जे प्रेक्षकांना फारच आवडल्याचे दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रिया वेब सिरीजच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. आज वर ती ‘क्रॅकडाऊन’, ‘द ब्रोकन न्यूज’ आणि ‘गिल्टी माइंड्स’ या वेब सिरीज मधून प्रेक्षकांसमोर आली आहे. श्रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मराठमोळ्या लुकमध्ये दिसत आहे. तिचे हे लूक पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. या फोटोमध्ये श्रियानी निळ्या रंगाची साडी त्यावर साजेल असे गोल्डन कलरची ज्वेलरी, अंबाडा आणि त्यावर गजरा माळला आहे. तिच्या या लूकचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करत या लुकला पसंती दर्शवली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रियाच्या (Shriya Pilgaonkar) या मराठमोळ्या लुकने अनेकांचे लक्ष वेधले आहे. श्रिया नुकतीच ‘ताजा खबर’
या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेब सिरीजमध्ये तिने साकारलेली भूमिका सर्वांनाच
आवडली होती. या वेब सिरीजमध्ये श्रिया बरोबर भुवन बम, शिल्पा शुक्ला यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली
आहे. श्रिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या तिच्या या मराठमोळ्या लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Web Title :- Shriya Pilgaonkar | bollywood shriya pilgaonkar share photo on social media
हे देखील वाचा :
Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या एअरपोर्ट लूकने वेधले सर्वांचे लक्ष