बहुजननामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) तिच्या अभिनयासोबतच सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. दीपिकाची एक स्माईल पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या ‘पठाण’ चित्रपटामुळे दीपिका (Deepika Padukone) खूपच चर्चेत आहे. नुकतेच दीपिकाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. यावेळी तिचा लुक पाहून सर्वांनी तिचे कौतुक केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या अभिनयाच्या जोरावर आज बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज दीपिकाचे हजारो चाहते आहेत. देश-विदेशात तिचे चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. दीपिका सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. दीपिकाला नुकतेच एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. यावेळी तिने संपूर्ण ब्लॅक लूक केल्याचे दिसत होते. तिचे हे ब्लॅक आऊटफिट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. यावर तिने ब्लॅक गॉगल आणि पांढरे शूज परिधान करून आपला लूक पूर्ण केला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दीपिकाच्या या सिम्पल डिंपल लुकमुळे सगळीकडून तिचे कौतुक होताना दिसत आहे. या लूकमध्ये दीपिका (Deepika Padukone) खूपच गॉर्जियस दिसत असल्याचे नेटकरी कमेंट करून तिची वाहवाई करत आहेत. तर आता दीपिकाच्या पठाण या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात दीपिका सोबत, शाहरुख खान आणि जॉन इब्राहिम देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Deepika Padukone | bollywood pathaan starring deepika padukone all black outfit latest airport look pics viral
हे देखील वाचा :
Nashik Accident | नाशिकमधील अपघातात होतकरु कबड्डीपटू तरुणीचा दुर्दैवी मृत्यू