पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केला. तसेच तिच्यावर दबाव टाकून गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) जून 2015 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत भोसरी येथील चक्रपाणी वसाहत येथे घडला.
याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करण ओमप्रकाश राजपूत (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्यावर आयपीसी 376, 376 (एन), 313, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले.
तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
यातून महिला गर्भवती राहिली असता आरोपीने महिलेवर दबाव टाकून गर्भपात करण्यास भाग पाडले.
यावेळी महिलेने माझी फसवणूक का करतो? अशी विचारणा केली असता आरोपीने महिलेला बेदम मारहाण केली.
आरोपीने महिलेच्या पोटात लाथा मारून जखमी केले.
तसेच महिलेच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | Sexual assault on a woman with the lure of marriage, type in Bhosari area
हे देखील वाचा :
Pune Crime | पोलिसांविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील मजकूर, 9 जणांवर एफआयआर