पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune ACB Trap | मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या (Pune Police Crime Branch) पोलीस कर्मचार्यासह खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Pune ACB Trap)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस शिपाई दीपक प्रल्हाद क्षीरसागर (वय 34) गुन्हे शाखा युनिट 3 आणि सिमोन अविनाश साळवी (वय 27) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई खडकी परिसरात मंगळवारी (दि. 29) रात्री उशिरा केली आहे. याप्रकरणी 30 वर्षांच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune ACB Trap) तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांच्या भावाचे मोबाइल खरेदी-विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. त्याला मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आले होते. या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी दीपक क्षीरसागर यांनी 2 लाखांची लाच मागितली. लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
पुणे युनिटने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दीपक क्षीरसागर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
क्षीरसागर याने 2 लाख रुपयांपैकी 40 हजार रुपये लगेच आणून देण्यास सांगितले.
तसेच लाचेची रक्कम साळवी यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर खडकी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचला.
तक्रारदाराकडून सिमोन साळवी याला 30 हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्यानंतर क्षीरसागरलाही ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
Web Title :- Pune ACB Trap | 2 lakhs in bribery case, Pune city police arrested two people including Kshirsagar of the crime branch, anti-bribery department action
हे देखील वाचा :
Pune News | साताराकडून पुण्याकडे येणारी वाहतूक नवीन कात्रजबोगद्यातून दरीपूलमार्गे
Nagnath Kottapalle Passes Away | ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन