पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | बेशिस्तपणे वाहन लावणाऱ्यांवर पुणे वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. वाहतूक पोलिसांनी एका दुचाकीवर कारवाई केल्यानंतर सोशल मीडियावर अश्लील मजकूर आणि ध्वनिचित्रफित व्हायरल करणाऱ्या आणि त्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या 9 जणांवर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय सागर (मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), प्रशांत पाटील, परिक्षित याल्लीर, विजय चौगुले, प्रज्वल सोनवणे, सचिन वाबळे, सतीश काळे, दत्तात्रय पटेरे, गणेश मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विजय सागर ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 27) वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहने लावणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. त्यावेळी विजय सागर यांच्या दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. सागर यांची दुचाकी क्रेनच्या साह्याने उचलण्यात आली. यानंतर सागर यांनी पोलीस करीत असलेल्या कारवाईचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर त्यांनी ध्वनिचित्रफित सोशल मीडियावर व्हायरल केली. यावर आठ जणांनी अश्लील भाषेत कमेंट केल्या. हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे विभाग) विक्रम गौड करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Obscene text on social media against police, FIR against 9 people
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | नवस फेडण्यासाठी दगडूशेठ गणपतीला चल असे म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग
Neena Gupta | नीना गुप्तांचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी केले कौतुक