पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | तुझ्यासाठी बुलेट घेतलीय, नवस फेडायला दगडूशेठ गणपतीला चल असे म्हणत गैरवर्तन करून तरुणीचा विनयभंग केला. हा प्रकार पिंपरी येथील नव महाराष्ट्र शाळेजवळ मंगळवारी (दि.29) सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 17 वर्षांच्या पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आदित्य उर्फ सागर संजू जाधव (वय – 19, रा. पिंपरी) याच्यावर आयपीसी 354, 354 (ड), 506, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)
पोलीस उपनिरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही नव महाराष्ट्र शाळेत इयत्ता
11 वीमध्ये शिकते. आरोपी हा ती राहत असलेल्या परिसरात राहतो.
बुधवारी सकाळी तरुणी कॉलेजमध्ये आली असता, आरोपी बुलेट गाडीवरून त्या ठिकाणी आला. त्याने तरुणीचा हात पकडून म्हणाला, ‘मी दगडूशेठ गणपतीला नवस केला आहे, मी जेव्हा नवीन बुलेट घेईन त्यावेळी माझ्या गाडीवर प्रथम तुला बसवून घेऊन येईन’, त्यावेळी तरुणीने हात झटकून सुटका करून घेतली. तरुणीने आरोपीला पाठलाग करू नकोस, अन्यथा शिक्षकांना सांगेन असे सांगितले. त्यावेळी ‘मी कोणाला घाबरत नाही, तू माझ्यासोबत चल नाही तर पळवून घेऊन जाईन,’ अशी धमकी देऊन गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune Pimpri Crime | College girl molested by asking Dagdusheth to go to Ganesha to pay his vows
हे देखील वाचा :
Shruti Haasan | आजारपणातील फोटो शेअर करत अभिनेत्री श्रुती हसन म्हणाली – ‘हा लुक देखील… ‘