बहुजननामा ऑनलाईन टीम : Shruti Haasan | सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन ही तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने वेळोवेळी जिंकतच असते. एवढेच नाही तर विदाउट मेकअपचे लुक देखील ती नेहमीच पोस्ट करत असते. श्रुती हसन ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज ती शेअर करत असते. श्रुती हसन ही सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांची लेक असून, तिने तिच्या मेहनतीमुळे स्वतःचे नाव कमावले आहे. नुकतीच श्रुतीने तिच्या नाकाची सर्जरी झाल्याचा खुलासा करत एक पोस्ट शेअर केली होती. आता यानंतर पुन्हा एकदा श्रुतीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Shruti Haasan)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रुतीने नुकताच इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. एका फोटोमध्ये ती मेकअप केलेली आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिचा आजारपणातील फोटो दिसत आहे. यामुळे ती एका फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तिचा लुक बदललेला दिसत आहे. फोटो शेअर करत श्रुतीने हटके असे कॅप्शनदेखील या फोटोला दिले आहे. (Shruti Haasan)
फोटो शेअर करत श्रुतीने म्हटले की, “परफेक्ट पोस्ट व सेल्फीच्या जगात माझे काही लुक फायनल होऊ शकले नाहीत. खराब केसांचा दिवस, ताप, सायनसमुळे सुजलेला चेहरा व मासिक पाळीचा त्रास आणि आराम……. तुम्हाला माझा हादेखील लुक आवडेल अशी आशा आहे”.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रुतीने विदाऊट मेकअप तिचा लूक शेअर केल्याने नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.
तर श्रुतीचा हा लूक देखील त्यांना आवडल्याचे कमेंट करून सांगत आहेत.
खरा चेहरा, अगदी सुंदर या लूकमध्ये देखील तू छान दिसतेस अशा कमेंट या फोटोला तिचे चाहते करत आहेत.
सध्या तापामुळे आणि मासिक पाळीच्या त्रासामुळे श्रुती हैराण झाल्याचे दिसत आहे.
Web Title :- Shruti Haasan | shruti haasan simple pic and suffer from fever look viral on social media
हे देखील वाचा :