Pune Pimpri Crime News | इंन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करुन महिलेची बदनामी, भोसरीतील प्रकार

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime News | इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट (Instagram Fake account) तयार करुन त्यावर महिलेचा फोटो लावून अश्लिल फोटो (Obscene Photo), व्हिडिओ (Video) व्हायरल करुन महिलेची बदनामी करत विनयभंग (Molestation) केला. हा प्रकार (Pune Pimpri Crime News) शुक्रवार (दि.27) सकाळी नऊ ते रविवारी (दि.29) या कालावधीत कासारवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी हरियाणातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 34 वर्षाच्या महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहेत पोलिसांनी प्रदिप गुज्जर Pradeep Gujjar (रा. हरियाणा-Haryana) याच्याविरुद्ध आयपीसी 354 (अ), 354 (ड), 509, 506, आयटी अॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बनावट इन्स्टाग्राम अकाउंड तयार करुन त्यावर फिर्यादी यांचा फोटो वापरला.
बनावट अकाऊंटच्या माध्यमातून आरोपीने अश्लिल फोटो, व्हिडिओ टाकून महिलेची बदनामी केली.
याचा जाब विचारला असता आरोपीने त्यांना फोटो हटवण्यासाठी पुन्हा अश्लिल मागणी केली.
तसेच ऐकले नाही तर मुलीचे खोटे इन्स्टाग्राम अकाउंट तयार करण्याची धमकी दिली.
तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद पवार (Police Inspector Arvind Pawar) करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime News | Defamation of a woman by creating a fake account on Instagram, type of Bhosari
हे देखील वाचा :
Aurangabad Crime News | मावस भावाला व्हिडिओ कॉल करत तरुणाची आत्महत्या; औरंगाबादमधील घटना
Pune Pimpri Crime News | विद्यार्थ्याच्या डोक्याला पिस्टल लावून लुटले, रावेत मधील घटना
Comments are closed.