Pune Pimpri Crime News | विद्यार्थ्याच्या डोक्याला पिस्टल लावून लुटले, रावेत मधील घटना

Pune Pimpri Crime News | Student held pistol to head and robbed, incident in Rawet

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन  Pune Pimpri Crime News | पिंपरी चिचंवड शहरामध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चोरी (Theft), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे, महिलांवरील अत्याचार, हत्याराचा धाक दाखवून लुटणे असे गुन्हे दररोज घडताना पाहायला मिळत आहेत. रावेत येथे मित्रासोबत दुचाकीवरुन जाणाऱ्या विद्यार्थ्याला अडवून त्याच्या डोक्याला पिस्टल (Pistol) लावून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी (Pune Pimpri Crime News) पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत निखिल रंगु मढली Nikhil Rangu Madhali (वय-18 रा. आंबेडकर नगर, देहुरोड, ता. हवेली, जि. पुणे) याने रावेत पोलीस ठाण्यात (Rawet Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध आयपीसी 392 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.29) रात्री पावणे आठच्या सुमारास रावेत येथील मस्के वस्ती ते सोनटक्के कॉर्नर कडे जाणाऱ्या कच्चा रोडवर घडली. (Pune Pimpri Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील मढली आणि त्याचा मित्र यासीर शकील शेख हे अॅक्टिव्हा (एमएच 14 एच.झेड 0691) वरुन जात होते. त्यावेळी आरोपी पाठीमागून आला. त्याने त्याची अॅक्टिव्हा गाडी निखील याच्या गाडीला आडवी घालून त्याला थांबवले.
आरोपीने त्याच्या कंबरेला असलेला गावठी कट्टा निखीलच्या डोक्याला लावून त्याच्या
गळ्यातील 95 हजार रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोनसाखळी (Gold Chain) जबरदस्तीने चोरुन नेली.
पुढील तपास पोलीस हवालदार आर.एस. पालांडे (Police Constable R.S. Palande) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | Student held pistol to head and robbed, incident in Rawet

 

हे देखील वाचा :

Kolhapur Crime News | कर्ज फेडले नाहीतर महिलांना वेश्या व्यवसाय करायला लावू, सावकाराकडून कुटुंबाला धमकी; कोल्हापूरमधील घटना

Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादीच्या आमदाराचा हल्लाबोल, तर सुप्रिया सुळेंचे मौन

Pune Crime News | विश्रामबाग परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या ‘सासु’चा छापा