Pune Pimpri Crime News | तळेगावमध्ये कोयता गँगची दहशत, डोक्यात वार करुन तरुणाला लुटले

Pune Pimpri Chinchwad Crime | Terror of Koyta Gang in Wakad, beating of floor workers in Phoenix Mall; FIR against 7 persons

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Pimpri Crime News | पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत आहे. पुणे शहर आणि परिसरात कोयता गँगने दहशत माजवली आहे. कोयता गँगवर (Koyta Gang) पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र, कोयता गँगची दहशत अद्यापही कायम आहे. तळेगाव दाभाडे येथे कोयता गँगने एका तरुणाच्या डोक्यात वार करुन लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime News) शनिवारी (दि.28) सायंकाळी पाचच्या सुमारास ईगल कॅफे बेलाडोअर सोसायटीच्या (Eagle Cafe Beladore Society) गेटजवळ घडला.

 

याबाबत निखिल तानाजी गडकर Nikhil Tanaji Gadkar (वय-30 रा. टेल्को कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निखिल जाधव Nikhil Jadhav (रा. तळेगाव दाभाडे), ऋषिकेश कुतळ Rishikesh Kutal (रा. राजगुरु कॉलनी, तळेगाव), नागेश नायडू Nagesh Naidu (रा. वाघेला पार्क, तळेगाव) यांच्याविरुद्ध आयपीसी 326, 394, 34, 506, क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Amendment Act), आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ईगल कॅफे बेलाडोअर सोसायटीच्या गेट जवळ थांबले होते.
त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. निखिल जाधव याने फिर्यादी यांचा 10 रुपये किमतीचा मोबाईल आणि
रोख अडीच हजार असा एकूण 12 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.
तसेच खुर्चीने, पुल टेबलस्टीकने व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले.
यानंतर निखिल जाधव याने फिर्यादी यांना जिवे मारुन टाकण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
तेथून जाताना आरोपींनी हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे (PSI Ingle) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | Terror of Koyta gang in Talegaon, robbed a young man by stabbing him in the head

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime News | इंन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करुन महिलेची बदनामी, भोसरीतील प्रकार

Aurangabad Crime News | मावस भावाला व्हिडिओ कॉल करत तरुणाची आत्महत्या; औरंगाबादमधील घटना

Kolhapur Crime News | कर्ज फेडले नाहीतर महिलांना वेश्या व्यवसाय करायला लावू, सावकाराकडून कुटुंबाला धमकी; कोल्हापूरमधील घटना