पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वारजे (warje) त सुरू असलेल्या ‘वारजे कुस्ती संकुल’ (Warje Wrestling Complex) या नवीन इमारत बांधकामाच्या ठिकाणावरून 80 हजार रुपयांचे प्लेट अज्ञाताने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विशाल पायगुडे (वय 40, रा. कुडजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्या (Warje Malwadi Police Thane) त तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कन्स्ट्रक्शन व्यवसायिक(construction builder) आहेत. वारजे येथे महानगरपालिकेतर्फे वारजे कुस्ती संकुल या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आरसीसीचे हे बांधकाम फिर्यादी यांना मिळाले आहे. या कामासाठी त्यांनी स्वतः सेन्ट्रीगच्या प्लेटा आणून ठेवल्या होत्या.
यादरम्यान लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच आतील 80 हजार रुपयांचे प्लेट चोरुन नेल्या आहेत. हा प्रकार दोन दिवसापूर्वी सकाळी उघडकीस आला आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.
web title: Theft of a plate worth Rs 80,000 from the construction site of a new building Warje Wrestling Complex
Ram temple scam | आरोप करणाऱ्यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज
Suicide News | दुर्देवी ! पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड, 23 वर्षीय युवकाची आत्महत्या
रक्षकच बनला भक्षक ! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार