मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Nitesh Rane | राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या वर्गणीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने (Shiv Sena) टीका केली. या टीकेनंतर काल सेनाभवनासमोर भाजपा (BJP)आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. सेनाभवनासमोरील राड्यानंतर शिवसेनेचे कट्टर वैरी असलेल्या नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. (“Tell Shiv Sainiks, your Uddhav Thackeray has rubbed his nose in front of our Modi,” Nitesh Rane told to Shiv Sena )
”सेनाभवनासमोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना जाऊन सांगा की, तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे.
मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात”, असं ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले.
तसेच भाजपाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना मानले, अशा शब्दात नितेश राणे यांनी सेनाभवनसमोर शिवसैनिकांशी भिडणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही नितेश राणे यांनी कौतुक केले आहे.
शिवसेना हिंदुत्व विसरली
दरम्यान, या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली.
त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला.
भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती.
काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली.
धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केले.
शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मात्र, सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी शिवसेना भवनापासून साधारण अर्धा किलोमीटरवरच या आंदोलकांना अडवले.
त्यानंतर युवा मोर्चाच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेले होते.
कृपया हे देखील वाचा:
Suicide News | दुर्देवी ! पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड, 23 वर्षीय युवकाची आत्महत्या
रक्षकच बनला भक्षक ! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार