Pune Crime News | अश्लील मेसेज करुन महिलेचा विनयभंग, सहकारनगर मधील घटना

Molestation Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कंपनीच्या केटरींग स्टाफमधील एकाने ज्येष्ठ महिलेला अश्लील टेक्स्ट मेसेज (Obscene Text Messages) करुन विनयभंग (Molestation) केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.7) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास महिलेच्या राहत्या घरी घडला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत सहकारनगर येथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) शुक्रवारी फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सचिन दिलीप वर्मा/सोनी (रा. मु.पो. देवगाह, उत्तर प्रदेश) याच्यावर आयपीसी 509 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिलेचे आयएसजी हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. (ISG Hospitality Pvt. Ltd.)
नावाची कंपनी आहे. त्यांनी गोवा येथील वेदांता कंपनीमध्ये (Vedanta Company Goa) काम घेतले आहे.
आरोपी सचिन वर्मा हा त्याच्या कंपनीच्या केटरींग स्टाफमधील कर्मचारी आहे.
गुरुवारी सायंकाळी फिर्य़ादी या त्यांच्या घरी असताना मोबाइलवर टेक्स मेसेज आला.
आरोपीने महिलेला अश्लील टेक्स मेसेज करुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक निकाळजे (PI Nikalje) करीत आहेत.