पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मैत्रिणीचे अश्लील फोटो (Obscene Photos) काढून ते व्हायरल करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिहार येथील मित्रावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पिडित महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) शुक्रवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. यावरुन अंकित राजेश पांडे Ankit Rajesh Pandey (वय-26 रा. गोरखपुर, बिहार) याच्यावर आयपीसी 354क, 354छ, 506 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. फिर्य़ादी त्याला भेटत असताना तसेच व्हिडिओ कॉलवर बोलत असताना आरोपी अंकित याने तरुणीच्या नकळत तिचे अश्लील स्क्रिन शॉट काढले. दरम्यान, आरोपीने त्याच्या कुटुंबियांची खोटी माहिती दिल्याने फिर्य़ादी यांनी त्याच्यासोबत बोलणे सोडून दिले होते. यानंतर अंकित याने लिंकडीन (Linkedin) या अॅपवरुन फिर्य़ादी यांचे अश्लील फोटो शेअर केले. तसेच तिच्या ऑफिसच्या मेल आयडीवर फोटो पाठले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तरुणीच्या गुगल पे तसेच वेगवेगळ्या सोशल मीडियावर तिला फॉलो करुन अश्लिल फोटो व व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (PI Jagannath Jankar) करीत आहेत. (Pune Crime News)
- न्यूड फोटो व व्हिडिओ पाठवून दोन महिलांचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल; कर्वेनगर मधील प्रकार
- पुण्यासह देशभरातील 44 ठिकाणी एनआयएचे छापे; 13 स्लिपर सेलना घेतले ताब्यात
- विश्रांतवाडी परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 65 वी स्थानबध्दतेची कारवाई
- लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कोथरुड परिसरातील प्रकार
- ‘मी भवानी पेठचा भाई, पोलीस देखील मला घाबरतात’ भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन
- पुण्यातील अधिकारी सातार्यात अँटी करप्शनच्या जाळ्यात; कामगार विभागाच्या उपसंचालक मागतात ३० टक्के कमिशन