सातारा : बहुजननामा ऑनलाईन – ACB Trap News | औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांच्या कामगारांची वैद्यकीय तपासणी केलेल्या बिलाची टक्केवारी म्हणून १७ हजार रुपयांची लाच (Accepting Bribe) घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Satara) कामगार विभागाच्या उपसंचालकाला रंगेहाथ पकडले. (ACB Trap News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नंदकिशोर आबासाहेब देशमुख Nandkishore Abasaheb Deshmukh (वय ४५, रा. विंडवड्स सोसायटी, वाकड) असे या उपसंचालकाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे शल्यचिकित्सक (Surgeon) आहेत. त्यांनी एमआयडीसीमधील दोन कंपन्यांच्या कामगारांची वैद्यकीय तपासणी केली होती. त्याची बिले सातारा औद्योगिक वसाहतीमधील (Satara Industrial Colony) औद्योगिक सुरक्षा व कामगार विभाग कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. ५८ हजार ४०० रुपयांच्या बिलाच्या ३० टक्के प्रमाणे १७ हजार ५२० रुपयांची लाच (Stara ACB Trap) उपसंचालक नंदकिशोर देशमुख याने मागितली होती. शल्यचिकित्सकांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात याची तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी पडताळणी केल्यावर देशमुख याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर औद्योगिक वसाहतीमध्ये गुरुवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून १७ हजार रुपयांची लाच घेताना नंदकिशोर देशमुख याला रंगेहाथ पकडण्यात आले. (ACB Trap News)
पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे (DySP Rajesh Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत (PI Sachin Raut), पोलीस नाईक गणेश ताटे, तुषार भोसले, नीलेश येवले यांनी ही कारवाई केली.
- महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 94 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA
- मनसे पदाधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; धायरीतील प्रकार
- बँकॉक-थायलंड ट्रीपच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार
- पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलंय! कारवाईची भीती दाखवत मुंबई क्राईम ब्रँचच्या नावाने दोघांकडून 31 लाख उकळले
- घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन, कात्रज परिसरातील घटना
- किरकोळ कारणावरुन कुटुंबाला मारहाण, महिलेच्या अंगावरील कपडे फाडून केला विनयभंग; वडगाव शेरी परिसरातील घटना
- लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर बलात्कार, लोणी काळभोर परिसरातील घटना