पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | घराजवळ सुरु असलेल्या बांधकामाचा मिक्सर बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन कुटुंबाला मारहाण (Beating) केली. तसेच महिलेच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार वडगाव शेरी येथे घडला आहे. याप्रकरणी ठेकेदारासह दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.3) दुपारी एकच्या सुमारास वडगाव शेऱी (Wadgaon Sherry) येथे घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पीडित महिलेच्या 44 वर्षीय पतीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) बुधवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. यावरून ठेकेदार कृरलत्तीन चौधरी (Contractors Kriralattin Chaudhary) व शशीकांत कातोरे Shashikant Katore (रा. वडगाव शेरी) यांच्यावर आयपीसी 354, 325, 323, 427, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या शेजारी बांधकाम चालु आहे.
या बंधकामाचा मिक्सर फिर्य़ादी यांच्या घराच्या खिडकीला चिकटुन लावला होता.
त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना तो मिक्सर बाजुला घेण्यास सांगितले.
याचा राग आल्याने आरोपींनी फिर्य़ादी यांच्यासोबत वाद घातला. त्यावेळी फिर्यादी यांची आई वाद सोडवण्यासाठी आल्या असता आरोपीने तिच्या कानशीलात लगावली. तर भावाची करंगळी पिरगाळून फ्रॅक्चर केली. तसेच फिर्य़ादी यांच्या पत्नीच्या अंगावरील कपडे फाडून स्त्री मनास लज्जा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर बलात्कार, लोणी काळभोर परिसरातील घटना
- PSI- Cop Dismissed In Pune | पुण्यात महिला पोलिस अधिकार्यासह दोघे सेवेतून बडतर्फ, जाणून घ्या प्रकरण
- NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला
- ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल
- Maharashtra Police News | नशेबाजाकडून दोन पोलिसांना जबर मारहाण