Pune Crime News | ‘मी भवानी पेठचा भाई, पोलीस देखील मला घाबरतात’ भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन

Molestationcase

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | ‘मी भवानी पेठचा भाई आहे, मला पोलीस (Pune Police) देखील घाबरतात’ असे म्हणत भररस्त्यात एका तरुणीला अश्लील शिवीगाळ (Obscene Abuse) करुन तिचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना भवानी पेठेत (Bhawani Peth) घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.5) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एकावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत भवानी पेठेत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.7) खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन बबन उर्फ अरबाज शेख Baban alias Arbaaz Shaikh (रा. चुडामन तालीम चौक, भवानी पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 341, 506, 509 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी एकाच परिसरात राहतात. तिने काढलेल्या मेहंदीचे पैसे आणण्यासाठी दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी आरोपीने त्याची दुचाकी तरुणीच्या दुचाकीला आडवी लावून तिला आडवले. मला तुझ्यासोबत लग्न करायचे असल्याचे आरोपी म्हणाला असता तिने लग्न करण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने, तुझे ज्याच्यासोबत लग्न जमले आहे त्याला मारुन टाकल्यानंतर माझ्या लग्न करशील ना, असे म्हणत तरुणीला अश्लील शिवीगाळ केली.

तसेच मी भवानी पेठचा भाई आहे, मला पोलीस देखील घाबरतात, तु काहीही करु शकत नाही असे बोलून शिवीगाळ केली.
फिर्यादी यांनी गाडी चालू केली असता आरोपीने तिच्या गाडीची चावी काढून घेत तोंडावरील काळा मास्क काढून फेकून दिली.
यानंतर तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.