Pune Police MPDA Action | उत्तमनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 66 वी स्थानबध्दतेची कारवाई
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police MPDA Action | उत्तमनगर, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bundagarden Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार चेतन लक्ष्मण चव्हाण (वय-22 रा. इंगळे कॉलनी, शिवणे, ता. हवेली) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 66 वी कारवाई आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपी उत्तमनगर (Uttamnagar Police Station) व बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल (Pistol), तलवार (Sword), धारदार हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे, दंगा, विनापरवाना पिस्तुल (Pistol) बाळगून दहशत पसरवणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागिल पाच वर्षात त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीवितास व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
https://www.instagram.com/reel/C0n4cKbJLKF/?utm_source=ig_web_copy_link
आरोपी चेतन चव्हाण याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्ध (Pune Police MPDA Action) करण्याचा
प्रस्ताव पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची
पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी चेतन चव्हाण याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती
कारागृहात (Amravati Central Jail) एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारावाई उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (Sr PI Kiran Balwadkar), गुन्हे शाखा,
पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre), पोलीस अधिकारी व अंमलदार
यांच्या पथकाने केली.
Comments are closed.