Pune Crime News | शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कॅफेमध्ये कॉफी पित असताना महिलेचा हात पकडून तिच्या सोबत गैरवर्तन केले. तसेच शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार लोहगाव येथील पोरवाल रोडवरील कॅफे कॉफी पिक (Cafe Coffee Pick) येथे शुक्रवारी (दि.8) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 36 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन ध्रुव सक्सेना (वय-27 पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्य़ादी यांच्या ओळखीचा आहे. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास
महिला पोरवाल रोडवरील (Porwal Road Lohegaon) कॅफे कॉफ पिक येथे कॉफी पित लॅपटॉपवर ऑफिसचे काम
करत होत्या. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी अचानकपणे आला. त्याने फिर्य़ादी यांचा हात पकडून गैरवर्तन करुन
विनयभंग (Molestation Case) केला. त्यावेळी महिलेने त्यांचा हात सोडवून घेतला असता आरोपीने शिवीगाळ
करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- अश्लील मेसेज करुन महिलेचा विनयभंग, सहकारनगर मधील घटना
- उत्तमनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 66 वी स्थानबध्दतेची कारवाई
- लोकलने प्रवास करायचाय अगोदर ब्लॉक पाहून घ्या; ब्लॉकमुळे पुणे लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द
- इंन्स्टाग्रामवर ओळख करुन महिलेवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करुन केली बदनामी; पुण्यातील धक्कादायक प्रकार
- Pune Crime News | व्हिडिओ कॉलवर बोलत असताना काढले अश्लील फोटो, व्हायरल करुन केला विनयभंग; पुण्यातील प्रकार
- ISIS Terror Conspiracy Case | पुण्यासह देशभरातील 44 ठिकाणी एनआयएचे छापे; 13 स्लिपर सेलना घेतले ताब्यात
Comments are closed.