पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | सिग्नलला रस्ता ओलांडताना मोटारसायकलची धडक बसल्याने एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यु (Death) झाला. जयश्री प्रदिप करंजीकर (वय ६४, रा. डहाणुकर कॉलनी,कोथरुड) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात कर्वे रोडवरील हॅपी कॉलनीकडून डहाणुकरकडे जाणार्या सिग्नलजवळ रविवारी रात्री पावणेअकरा वाजता घडला. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) भावेश नंदलाल आहिरे (वय २८, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबतची माहिती अशी, जयश्री करंजीकर या डहाणुकर कॉलनीत रहातात. रात्री जेवण झाल्यानंतर त्या शतपावली करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. कर्वे रोडवरील डहाणुकर कॉलनीकडे जाणार्या सिग्नलजवळ त्या रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या मोटारसायकलचालकाने त्यांना धडक दिली. त्यात त्या जबर जखमी झाल्या.
त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले असताना डॉक्टरांनी मृत्यु झाल्याचे घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | An elderly woman died after being hit by a motorcycle while crossing the road
हे देखील वाचा :
Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या