बहुजननामा ऑनलाईन – बॉलीवूडचा अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूपच चर्चेत आहे. रणबीरचा गेल्या वर्षी आलेला ‘शमशेरा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई जरी करू शकला नाही तरी ‘ब्रह्मास्त्रने’ मात्र बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर येणाऱ्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती यावर आता रणबीरने भाष्य केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रणबीर कोलकत्ता येथे त्याच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. त्यावेळी त्याला विचारण्यात आले होते की, “सौरव गांगुलीच्या बायोपिक बद्दल काय सांगाल” यावेळी बोलताना तो म्हणाला, “सौरभ गांगुली ही व्यक्ती केवळ देशासाठीच नव्हे तर जगभरासाठी मोठी व्यक्ती आहे आणि त्यांच्यावर होणाऱ्या बायोपिक मध्ये काम करणे म्हणजे माझे भाग्यच असेल. मात्र अद्याप तरी या चित्रपटाबाबत मला विचारण्यात आलेले नाही. माझ्या मते चित्रपटाचे निर्माते पटकथेवर अजून काम करत आहेत”.
पुढे बोलताना तो म्हणाला, “मी गेली 11 वर्ष किशोर कुमार यांच्या बायोपिकवर काम करत आहे.
सध्या यावर काम सुरू आहे. अनुराग बसू आणि मी आशा करतो की हा माझा पुढील बायोपिक असेल.
मात्र आत्तापर्यंत दादावर होणाऱ्या बायोपिक बद्दल माझ्या कानावर काहीही आलेले नाही आणि मला काही
माहित देखील नाही”. रणबीर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धाचा ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपट 8 मार्च
म्हणजेच होळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली तर दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे.
Web Title :- Ranbir Kapoor | bollywood actor ranbir kapoor confirms that he is not doing biopic on saurav ganguly
हे देखील वाचा :
T20 Women’s World Cup | दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा जिंकले विश्वविजेतेपद