पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | क्रेडिट कार्ड (Credit Card) बिलाबाबत ऑनलाईन तक्रार ट्वीटरवर केली असता टीम व्हिव्हर अॅप (Team Viewer App) डाऊनलोड करण्यास सांगून सायबर चोरट्यांनी ८९ हजार ६५० रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी लोणीकाळभोर येथील ३४ वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०८/२३) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांचे क्रेडिट कार्डचे बिल मिळाले. ते त्यांना अधिक वाटल्याने त्यांनी त्याची तक्रार ट्वीटरवर एचडीएफसी बँकेकडे केली. परंतु, ते ट्वीटर खाते बनावट होते. त्यानंतर त्यांना हेल्पलाईनला संपर्क करण्यास सांगण्यात आले. त्यांना ते खरे वाटल्याने त्यांनी संपर्क साधला असताना त्यांना बँकेकडून लागलेले एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन देतो, असे सांगून टीम व्हिव्हर अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी अॅप डाऊनलोड केल्यावर त्यांच्या खात्यातून ८९ हजार ६५० रुपये काढून घेऊन फसवणूक करण्यात आली.
Web Title :- Pune Crime News | Expensive to reduce extra charges; Tricked into downloading Team Weaver app
हे देखील वाचा :
T20 Women’s World Cup | दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा जिंकले विश्वविजेतेपद