मेहबुब सैफान बलुरंगी (वय-33 रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), निलेश सुनिल कुंभार (वय-30 रा. लक्ष्मी कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) आणि सुफियान फैयाज चौरी (वय-19 रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात (Pune Crime) घेतले आहे. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयाने 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मेहबुब बलुरंगी आणि निलेश कुंभार यांच्यावतीने अॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) आणि अॅड. तन्मय देव (Adv. Tanmay Dev) यांनी बाजू मांडली. (Pune Crime)
काय आहे प्रकरण?
समीर हा पूर्वी जनता वसाहत (Janta Vasahat Pune) येथे राहात होता. मेहबुब याची जनता वसाहतीत टपरी आहे. तो व्याजाने पैसे देत असे. तसेच भिशीही चालवित असे. समीरला मेहबुब याने संतोषनगर येथील प्लॉटच्या बांधकामाचे काम दिले होते. त्या व्यवहारापोटी मेहबुब याने पाच लाख रुपये दिले होते. त्यापैकी अडीच लाख रुपये समीरने परत केले होते. उरलेले अडीच लाख रुपये परत कारावे, अशी मेहबुब समीरकडे वारंवार मागणी करत होता. या आर्थिक व्यवहारातून मेहबुब याने इतर तिघांशी संगनमत करुन कट (Conspiracy of Murder) रचला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास समीर बुलेटवरुन दत्तनगर येथील कार्यालयात निघाला होता.तो चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या.डोक्यात गोळी लागल्याने समीर बुलेटवरच पडला. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
Web Title :- Pune Crime | Accused in Pune Congress worker and builder Sameer alias Lalbadshah murder case remanded in police custody
Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद