पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला असून लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) तरुणाच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
महावीर उत्तम जगदाळे (वय ३२, रा. उरळी कांचन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल उत्तम जगदाळे (वय ५८, रा. करमाळा) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर जगदाळे यांचे ७ ते ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तो मिळेल तेथे मोलमजुरी करीत असे. त्याची पत्नी एका बांधकाम व्यावसायिकाकडे साईट दाखविण्याचे काम करते. लॉकडाऊनच्या काळात काम नसल्याने महावीर हा काही महिने गावाला गेला होता. तेथून परत आल्यानंतरही तो काही काम करीत नसल्याने पती पत्नीत भांडणे होत होती.
ही बाब त्याच्या पत्नीने आपल्या सासर्यांना सांगून त्यांना पुण्याला बोलावून घेतले होते. त्यांनी येऊन समजून सांगितले होते. त्यानंतर ८ दिवसांनी ८ नोव्हेबरला रात्री महावीर याने घरी गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime) केली. पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Shocking! 32-year-old man commits suicide in Pune Incidents in the Loni Kalbhor area wife harassment cases
Mandakini Khadse | भोसरी भूखंड प्रकरणात मंदाकिनी एकनाथ खडसेंना दिलासा
Vicky-Katrina | पहिल्यांदाच सोबत दिसले विकी आणि कतरीना
Rayat Shikshan Sanstha | रयत शिक्षण संस्थेत तब्बल 1189 पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर