अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Maharashtra | पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून लोकांना लाखो रुपयांना फसविल्या प्रकरणात एका महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याच्या जामीनासाठी मदत करण्यासाठी 10 लाखाची मागणी करून तडजोडीनंतर 7 लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रबिबंधक विभागाने Anti (Corruption Bureau Maharashtra) सापळा रचून दोघा खासगी व्यक्तीसह सहायक पोलीस निरीक्षकाला (API) रंगेहाथ पकडले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनिल घुगल API Anil Ghugal (वय ५२) असे या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. विद्युत वसानी व विशाल माकडे (दोघे रा. यवतमाळ) अशी अटक केलेल्या अन्य खासगी व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी यवतमाळ (Yavatmal) येथील एका ३१ वर्षाच्या महाराजाविरोधात लोहारा पोलीस ठाण्यात (Lohara Police Station) गुन्हा दाखल आहे. या महाराजाने अनेकांना पैशांचा पाऊस होईल,असे सांगून त्यांना लाखो रुपयांना लुबाडले आहे. १५ नोव्हेबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात तक्रारदार याचा जामीन होण्यास मदत होईल, असा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अनिल घुगल याने तक्रारदार याच्याकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ६ डिसेंबर रोजी तक्रार (ACB Yavatmal) दिली होती.
Web Title :- anti corruption bureau maharashtra anti corruption bureau acb arrested assistant police inspector api in 10 lacs bribe case in yavatmal
Sitaram Kunte | अनिल देशमुख प्रकरणात सीताराम कुंटेंची 6 तास चौकशी, जाणून घ्या नेमकं काय झालं?
Pune Corporation | शहरातील अनाधिकृत बॅनर अन् झेंड्यांबाबत पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !