पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade News) पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळ्या झाडून युवकाची हत्या (Murder in Pune) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळ्या झाडून अज्ञातांनी एका 17 वर्षीय युवकाची हत्या केली. दशांत अनिल परदेशी (Dashant Anil Pardeshi) (वय 17, रा. तळेगाव दाभाडे) असं हत्या झालेल्या युवकाचे नाव (Pune Crime) आहे.
ही घटना बुधवारी (22 डिसेंबर) रोजी मध्यरात्री नॅशनल हेवी कंपनीजवळ तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी दशांतचे वडील अनिल परदेशी (Anil Pardeshi) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली. यानूसार अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी की, तळेगाव दाभाडे येथील नॅशनल एका जवळ गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी दशांत परदेशी याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन दशांतचा मृत्यू (Died) झाला. याबाबत रात्री 12.30 वाजता तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती समजली. यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी (Pune Crime) पाठवण्यात आला.
दरम्यान, दशांतची नेमकी हत्या कुणी आणि का केली? याबाबत कोणतेही माहिती समोर नाही. तर, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | 17 year old Dashant Anil Pardeshi shot dead in Talegaon Dabhade, Pune; Huge excitement everywhere.