Vidhwa Pension Scheme | मोदी सरकार ‘या’ महिलांच्या अकाऊंटमध्ये दरमहा जमा करेल 2250 रुपये, आपल्या राज्याच्या हिशेबाने तपासा तुमच्या खात्यात किती रक्कम येईल?; जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Vidhwa Pension Scheme | मोदी सरकार विधवा पेन्शन स्कीम (Vidhwa Pension Scheme) द्वारे आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना मदत करते ज्या अंतर्गत त्या आपले जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतात. विधवा पेंशन स्कीम (Vidhwa Pension Scheme) अंतर्गत महिलांना दर महिना पेन्शनची रक्कम दिली जाते.
कोण घेऊ शकतात लाभ?
या योजनेचा लाभ केवळ त्याच महिला घेऊ शकतात ज्या दारिद्रय रेषेच्या खाली येतात. याशिवाय अर्जदार महिला सरकारच्या एखाद्या दुसर्या योजनेचा लाभ घेत असेल तर हा लाभ घेऊ शकत नाही. अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्य आणि विधवा पेन्शन योजनेची रक्कम
1. हरियाणा 2250 रुपये प्रति महिना
2. उत्तर प्रदेश 300 रुपये प्रति महिना
3. महाराष्ट्र 900 रुपये प्रति महिना
4. राजस्थान 750 रुपये प्रति महिना
5. दिल्ली 2500 रुपये प्रति महिना
6. गुजरात 1250 रुपये प्रति महिना
7. उत्तराखंड 1200 रुपये प्रति महिना
कोणते कागदपत्र आहेत आवश्यक
या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar Card), पतीच्या मृत्यूचा दाखला, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, बँक अकाऊंट पासबुक (Bank Account Passbook), मोबाइल नंबर (Mobile Number) आणि पासपोर्ट साईज फोटो (Passport Size Photo) पाहिजे.
Web Title :- Vidhwa Pension Scheme | central government scheme vidhwa pension yojana women get every month pension under this scheme vidhwa pension.
Comments are closed.