पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीत मागील काही दिवसांपासून 5 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या (Pune Corona Updates) 5521 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजाराच्या वर गेली आहे.
शहरात आजपर्यंत 6 लाख 20 हजार 548 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे.
आज शहरात 6333 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 5 लाख 66 हजार 887 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 03 तर शहराबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 209 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 44 हजार 452 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 342 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
46 रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 35 नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 18,082 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
Web Title :- Pune Corona Updates | In the last 24 hours, 6333 patients in Pune city are corona free, find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप, साधू PM मोदींकडे मागणी करत म्हणाले…
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 8,334 रुपये मासिक जमा केल्यास मिळतील 7 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर
- Ajit Pawar | …तर राज्यात आर्थिक संकट – अजित पवार
- Padma Bhushan Award | सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार
- Police Suicide | पुण्यातील एसआरपीएफच्या पोलीस जवानाने एसएलआरतून गोळी झाडून केली आत्महत्या; प्रचंड खळबळ