नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Nashik Crime | प्रजासत्ताक दिनी (Republic Day) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक (Nashik Crime) मध्ये महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सुवर्णा वाझे-जाधव (Dr. Suvarna Waze-Jadhav) असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वाडीवर्हे पोलीस ठाण्यातील (Wadivarhe Police Station) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. सुवर्णा यांचा मृतदेह एका गाडीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा (Municipal Women’s Medical Officer) मृतदेह (Dead Body) जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या वाडीवर्हे परिसरात एका वाहनात हा मृतदेह आढळून आला आहे. तर ज्या वाहनात हा मृतदेह आढळून आला आहे ते वाहन देखील पूर्णपणे आगीत जळून खाक झाले आहे. वाझे या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. (Nashik Crime)
कालच सुवर्णा वाझे-जाधव यांच्या पतीने अंबड पोलिसांत (Ambad Police Station) मिसिंगची पोलिसांत तक्रार दिली होती.
तर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मनपा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नेमकी ही दुर्घटना आहे की घातपात त्या दृष्टीने तपास सुरू आहे, मात्र एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह अश्या अवस्थेत आढळल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title :- Nashik Crime | death body found of nashik municipal corporation female medical officer Dr. Suvarna Waze Jadhav in Wadivarhe Police Station area of nashik
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 8,334 रुपये मासिक जमा केल्यास मिळतील 7 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर
- Ajit Pawar | …तर राज्यात आर्थिक संकट – अजित पवार
- Padma Bhushan Award | सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार
- Police Suicide | पुण्यातील एसआरपीएफच्या पोलीस जवानाने एसएलआरतून गोळी झाडून केली आत्महत्या; प्रचंड खळबळ