पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Accident News | शिक्रापूर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) डॉक्टर दाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात झाला. उलट्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक कारला बसली. या अपघातात (Pune Accident News) डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे Dr. Sonali Machindra Khaire (वय-37) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे Dr. Machindra Narayan Khaire (वय- 42) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) ट्रक चालक पवन भगवान साठे (वय 25 रा. किनी ता. जळगाव जि. बुलढाणा) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूरमधील खैरे हॉस्पिटलचे संचालक (Khaire Hospital Director) डॉ. मच्छिंद्र खैरे आणि त्यांच्या पत्नी सोनाली खैरे हे दोघे बुधवारी (दि.15) पुण्याहून नगरला जात होते. पुणे नगर महामार्गावर शिक्रापूरयेथील साई सहारा पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी गेले होते. पेट्रोल टाकून परतत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रकची (MH 12 QG 7447) धडक खैरे यांच्या कारला बसली.
धडक बसल्यानंतर कारचा पुढील निम्मा भाग आतमध्ये गेला. यामध्ये कारच्या पुढे डाव्या बाजूला बसलेल्या डॉ. सोनाली यांचा जागीच मृत्यू झाला.
तर डॉ. मच्छिंद्र हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेबाबत डॉ. कैलास बाळासाहेब बांदल (Dr. Kailas Balasaheb Bandal) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डॉ. खैरे हे शिक्रापूरमध्ये मागील अनेक वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचा परिसरात दांडगा संपर्क आहे.
डॉ. सोनाली खैरे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. सोनाली यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Accident News | a truck hit the car of a doctor couple on the pune nagar road wife died on the spot husband is under treatment
हे देखील वाचा :