उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन – Osmanabad Crime News | उस्मानाबाद येथील राष्ट्रवादीच्या (NCP) प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील (Manisha Patil) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला (Knife Attack) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज्ञात व्यक्तीने पाटील यांच्यावर चाकून हल्ला करुन खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) केला. परंतु पाटील यांनी प्रसंगावधान राखून हातावर वार झेलल्यामुळे (Osmanabad Crime News) त्या थोडक्यात बचावल्या. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बचतगटाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमिततेविरोधात केलेल्या तक्रारीमुळे जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. निपाणीकर (B.H. Nipanikar) यांचा यामागे हात असल्याचा संशय मनीषा पाटील यांनी व्यक्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) संध्याकाळी पाटील घरी असताना घडली. (Osmanabad Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील यांच्या घरात मंगळवारी संध्याकाळी चेहरा कपड्याने बांधलेल्या अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला.
हातात चिठ्ठी देऊन दुसऱ्या हाताने त्यांच्यावर धारदार चाकून वार करुन खुनी हल्ला चढवला.
मात्र, प्रसंगावधान राखून पाटील यांनी तो वार हातावर झेलला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
पाटील यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या घरातील लोकांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली.
तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाला. नागरिकांनी पाटील यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.
पाटील यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात (Anandnagar Police Station) याबाबत फिर्याद दिली आहे.
सीसीटीव्हीत घटना कैद
मनीषा पाटील यांच्यावर झाललेल्या खुनी हल्ल्याची घटना त्यांच्या घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरु केला आहे.
या घटनेचा लवकरच उलगडा होईल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Osmanabad Crime News | ncp osmabanad woman president manisha patil was attacked by unkown person
हे देखील वाचा :