पुणे/भोर : बहुजननामा ऑनलाईन – खात्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी आणि रजा मंजूर करण्यासाठी 4 हजार रुपये लाच घेताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भोर आगार व्यवस्थापकासह चालकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने (Pune ACB Trap) ही कारवाई भोर येथील एसटी आगारातील कक्षाच्या बाहेर सोमवारी (दि. 5) केली.
भोर आगार व्यवस्थापक युवराज दिनकरराव कदम (वय 52), चालक विजय नामदेव राऊत (वय 51) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 49 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तक्रारदार यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी तसेच रजा मंजूर करण्यासाठी
आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
पुणे युनिटने पडताळणी केली असता, कदम यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम चालक विजय राऊत याच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार पथकाने भोर एसटी आगारात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपये लाच घेताना विजय राऊत यांना रंगेहात पकडले.
यानंतर आगार व्यवस्थापक युवराज कदम यांना ताब्यात घेण्यात आले.
दोघांवर भोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस निरीक्षक विरनाथ माने आणि त्यांच्या पथकाने केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune ACB Trap | Bhor Agar manager of Rapam along with driver caught in anti-corruption net while accepting bribe of Rs.4 thousand
हे देखील वाचा :
Kolhapur Crime | उसणवारीच्या पैशासाठी वृद्ध महिलेचा खून; बाप-लेक पोलिसांच्या ताब्यात
Pune Police | स्व. सदू शिंदे क्रिकेट लीग स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी पुणे पोलीस उपविजेता