पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्व. सदू शिंदे क्रिकेट लीग या मानाच्या स्पर्धेत पुणे पोलिसांच्या (Pune Police) क्रिकेट टीमने उपविजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत पुणे पोलिसांनी (Pune Police) सगल दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद पटकावले आहे. या कामगिरीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व खेळाडूंचा विशेष सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्व. सदू शिंदे क्रिकेट लीग स्पर्धेत एकूण 42 संघांनी सहभाग घेतला होता. पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वत: सहभाग घेऊन खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. कायदा व सुव्यवस्था तसेच नियमित कामाचे योग्य नियोजन करून खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.
विजेत्या संघातील खेळाडूंना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले.
या स्पर्धेत पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, विश्वजीत तारू, शिवाजी दबडे,
आरिफ शेख, विपुन गायकवाड, अमित बोडरे, अमरनाथ लोणकर, प्रशांत गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड,
तेसज भोसले, अंकुश दिघे, महेश राठोड, अमोल पायगुडे, अमर साळवे, रवींद्र गोलाने, स्वप्नील कांबळे,
अश्विन कुमकर, अश्वजित सोनवणे, अजिंक्य गायकवाड, नीलेश कुलथे यांनी सहभाग नोंदवला.
Web Title :- Pune Police | self Pune Police runner-up in Sadu Shinde Cricket League competition for the second year in a row
हे देखील वाचा :
Uday Samant | ‘जत तालुक्याच्या पाणीप्रश्नासोबतच शंभर हेक्टर जागेत एमआयडीसी उभारणार’ – उदय सामंत
Pune Crime | टपरीचालकावर धारदार हत्याराने वार; कोंढव्यातील घटना