नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – लेखक व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पुणे येथील पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली असून याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. येथील गौतम बुद्ध युवा सोशल संघटना व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निषेध करुन याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, डॉ.आनंद तेलतुंबडे हे मानव हक्कासाठी लढणारे साहित्यीक आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदार नातीचे ते पती आहेत. दि. १ फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी त्यांना बेकायदेशीररित्या अटक केली आहे. सदर घटनेचा गौतम बुद्ध युवा सोशल संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. खरेतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत अटक करण्यात येऊ नये असे निर्देश दिलेले असतांनाही त्यांना अटक करण्यात आली.
तसेच व्हॉटसअप अथवा सोशल मिडीयावर कोणताही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने निवेदनातून दिला आहे. निवेदनावर संजू रगडे, रविंद्र रगडे, मोगेश भालेराव, शशि खरताडे, रुपेश कांबळे, विशाल चित्ते, मुन्ना येलवार, रोहित भालेराव, लोटन पेंढारकर, गोलू राजपूत, राकेश तमायचेकर, मेहूल मछली, रवि वंजारा, पप्पू पगारे, निखील चित्ते, आकाश जयस्वाल, कालू मराठे, प्रमोद कांबळे, कृष्णा भालेराव, विलास फुलपगारे, इरफान तडवी यांच्या सह्या आहेत.