मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रियांका चोप्रा ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तरी वेगवेगळे कपडे घालणे, सिगारेटचे व्यसन, फोटो काढणे त्यामुळे ती अनेकदा ट्रोल होत असते. पण आता प्रियंका एका वेगळ्या कारणाने ट्रोल झाली आहे. तिने एका अल्कोहलच्या ब्रँडची जाहिरात केली आणि हे तिचे फॅशन टूर होते. यात प्रियंका यात आपले यशस्वी आयुष्याचे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवताना दिसत आहे. पण ती या जाहिरातीमुळे आता खूपच ट्रोल झाली आहे.
तिच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून तिला लोकांनी चांगलेच ट्रोल केले आहे. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका करत ‘अस्थमा ठीक झाला, आता दारू चालत आहे’, अशी टीका केली आहे. तसच एका नेटकऱ्याने यांचे आजार देशाबाहेर गेल्यावर लगेच नीट होते, असं म्हटलं आहे. तर दीदीला कोणी सिगार आणून द्या, तर एकाने हे लोक पैशांसाठी विषाचीही जाहिरात करतील असे म्हंटले आहे.
तर काहींनी तिचे कौतुकही केले आहे. व्हीडिओमध्ये प्रियंकाने तिच्या यशाविषयी सांगितले असून तिचे यश आणि मिळवलेले यश तिने तिच्या हिमतीवर मिळवले असल्याचेही तिने सांगितले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. हा व्हीडिओ ब्लॅक आणि व्हाईट मध्ये बनवण्यात आला आहे. तसंच प्रियंका यात ३ वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.