विजयवाडा : वृत्तसंस्था – विद्यार्थ्यांना शाळेत ज्ञानाचे धडे दिले जातात, प्रात्यक्षिकांदव्यारे त्या समजून सांगितल्या जातात. परंतु आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील चिंतालपुडी या गावात सरकारी शाळेत चक्क बलात्कार कसा होतो या संदर्भातील प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्याची घटना आढळून आली. याविरुद्ध दोन शिक्षकांना गावकर्यांनी चांगलाच चोप दिला आहे. परंतु शिक्षणाधिकारी सी. व्ही. रेणुका यांनी अशी कोणतीच घटना घडली नसल्याचा दावा केला आहे.
शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीवर हा बलात्काराचा डेमो करण्यात आला. यात झालेल्या हाणामारीत दोन विद्यार्थी आणि आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी वापर केलेल्या विद्यार्थिनीला दुखापत झाली आहे. तरी अश्या संदर्भातील कोणतीच माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही, असे रेणुका यांनी सांगितले. अद्याप याविरुद्ध कोणतीच तक्रार दाखल झालेली नाही.